पोस्ट्स

धनवंती रामाराव

इमेज
          धनवंती रामाराव : कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या जनक  साधारणपणे, जग मार्गारेट सेंगर यांना जन्म नियंत्रण जागृती कार्यक्रमांची प्रणेते म्हणून ओळखते.  तथापि, भारतातील कुटुंब नियोजनाचे निर्माते, महिलांच्या पुनरुत्पादक हक्कांसाठी कट्टर प्रचारक आणि आंतरराष्ट्रीय नियोजित पालकत्व महासंघाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष धनवंती रामाराव यांच्या प्रयत्नांचा देश विसरला आहे.  स्त्रीवादी आणि दूरदृष्टी असलेल्या धनवंतीला हे जाणवले की देशातील बहुतांश समस्या कुटुंब नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाल्या आहेत.     त्यांच्या मेहनती आणि एकाग्र प्रयत्नांमुळे, 1952 मध्ये देशव्यापी कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा भारत विकसनशील देशांपैकी पहिला देश बनला.  कार्यक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये जन्म नियंत्रण, सुरक्षित मातृत्व, मुलांचे संगोपन, कुटुंब कल्याण आणि बालविवाहाविरोधातील मोहिमा यांचा समावेश आहे.  आपण धनवंती  रामाराव, पद्मभूषण विजेत्या म्हणून  आणि भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे संस्थापक म्हणून त्यांना कायम लक्षात ठेवूया.   महिल...

हमन इश्क है मस्ताना

इमेज
                                                       विमलेश त्रिपाठी ( कोलकाता ) (विमलेश त्रिपाठी हे हिंदीतील महत्त्वाचे कवी व लेखक आहेत. दरवर्षी जानेवारीला ते ' अनहद ' नावाचा साहित्य उत्सव घेत असतात . सध्या त्यांनी लिहिलेली ' हमन इश्क है मस्ताना ' ही कादंबरी विशेष चर्चेत आहे. माध्यमांचा स्फोट झाल्यानंतर स्त्री - पुरुष संबंध आणि विवाहसंस्थेवर होणाऱ्या परिणामावर ही कादंबरी भाष्य करते. या कादंबरीचा अनुवाद साहित्याक्षर प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत आहे . त्या कादंबरीचे हे पहिले प्रकरण . अनुवाद करत आहेत डॉ. संजय बोरुडे .- प्रकाशक ) ****†***************"*"""""""*"""""**** एक माझे मन दु:खी होते. असे वाटत होते की कोणीतरी दूर समुद्राच्या पलीकडून मोठ्याने हाक मारत आहे - एक आत्मीय सगा माझ्यापासून विभक्त झाला आहे. मला ताबडतोब तिकडे जायचे होते पण मी वास्तवाच्या कठोर भूमीवर  गुडघ्यात डोके घालून  शांत बसलो.  ऑफिसमधल्या एक मात्र कॉम्प्युटर टेबलव...

शेवटचे गीत

इमेज
  शेवटचे गीत लेखकः किऊ बिच हाऊ, व्हिएतनाम .                            (   किऊ बिच हाऊ, व्हिएतनाम . या हनोई येथे राहतात . व्हिएतनाम लेखक संघाच्या त्या सचिव असून उत्कृष्ट कवी आणि लेखिका आहेत. साहित्याक्षरच्या वतीने लवकरच त्यांचा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची ही कथा प्रस्तुत करीत आहे - प्रकाशक  ) त्या व्हीआयपी टेबल ने त्या आलिशान बारमध्ये एक सर्वोच्च स्थान मिळवलेले होते . ते टेबल एका अतिशय आलिशान अशा हॉटेलमध्ये होते ज्यावर बसण्यासाठी  खूप दिवस अगोदर आरक्षण करावे लागत असे , तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यावर बसायला मिळेल याची शाश्वती नसे. त्या अतिशय महागड्या आणि अलिशान  हॉटेलमधून बाहेर पडताना जेव्हा तुम्हाला कोणी पाहिल तेव्हा नक्कीच तुमचं सामाजिक स्थान एका उंचीवर जाऊन पोहोचलेलं असेल इतक्या उच्चभ्रू समाजातल्या लोकांसाठी ते हॉटेल होतं ! त्या हॉटेलमध्ये फक्त जाझ संगीत वाजवले जायचे आणि तेही बुधवार शुक्रवार आणि रविवार संध्याकाळीच . त्या काळातला अतिशय प्रसिद...