पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक हृदयस्पर्शी खंडकाव्य : नवा मोहर गळतो

इमेज
  नवा मोहर गळतो : एक हृदयस्पर्शी खंडकाव्य ( प्रस्तुत खंडकाव्याला लिहिलेली ही प्रस्तावना असून खंडकाव्याच्या इतिहासाची माहिती व्हावी म्हणून ती इथे लेख स्वरूपात देत आहोत - संपादक ) खंडकाव्याची व्याख्या संस्कृतच्या 'साहित्य दर्पण' मध्ये आढळते. भाषा किंवा उपभाषा यामध्ये सर्गबद्ध किंवा एका कथेचे निरुपण करणारे काव्य म्हणजे खंडकाव्य होय. महाकाव्याचा तो एक अंश म्हणता येईल. खंडकाव्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतीलः १. खंडकाव्यत ही अखंड कथा आहे. २. कथेचा विन्यास , आरंभ, विकास, उत्कर्षबिंदू आणि प्रयोजन याप्रमाणे असतो.  ३. ते आकाराने दीर्घ नसते. ४. त्यामध्ये आठ पेक्षा कमी सर्ग असावेत. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दीर्घ कवितेची टूम निघाली होती. लांब पल्ल्याची कविता लिहिणे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. त्यातच एका दीर्घ कवितेला पाच आकडी पुरस्कार मिळाल्याने हे लोण जास्तच फोफावले गेले. मात्र लवकरच हे आर्थिक प्रयोजन नष्ट झाल्याने ती टूम संपुष्टात आली, असो. ही सर्व चर्चा करण्याचे कारण म्हणजे बबन धुमाळ यांचे 'नवा मोहर गळतो' हे खंडकाव्य. खरंतर, ओवी छंदातील हे आख्यान म्हणता येईल. पण त्या...

सत्याचा नि सत्वाचा शोध : अभिसत्य

इमेज
  सत्याच्या शोधातील कविताःअभिसत्य - मनीषा पाटील-हरोलीकर  ******************************************* कवी,लेखक व समीक्षक डाॕ.संजय बोरुडे यांनी अनुसृजन केलेला अभिसत्य हा कवितासंग्रह डिसेंबर २०२२ मध्ये साहित्याक्षर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.हा कवितासंग्रह हंगेरियन कवी *सॕन्दोर हालमोसी* यांनी लिहिला आहे.ते हंगेरीतील मान्यताप्राप्त कवी आहेत.त्यांच्या कवितांचा अत्यंत तरल भाषाशैलीत कवी संजय बोरुडे यांनी अनुवाद केला आहे.पण त्यांनी त्यास 'अनुसृजन'असे म्हटले आहे.कारण खरा अनुवाद ही एक नवनिर्मितीच असते,असे ते मानतात.मूळ रचनाकाराला जे व जसं म्हणायचं आहे ते व तसं ते अनुवादात उतरवण्याची काळजी घेतात.त्यामुळे ते म्हणतात ,'मूळ कवीच्या उरातली आग,धग,ओलावा,आस्था ,भावना जशाच्या तशा वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ऊर्मी माझ्यातल्या अनुवादकाला जिवंत ठेवते. '     मराठी साहित्यात उमा कुलकर्णी ,वीणा गवाणकर,सुप्रिया वकील,वसंत केशव पाटील,सोनाली नवांगुळ अशा अनेक थोर लेखकांनी विविध भाषेतील लेखकांच्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे.त्यामुळे सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक तसेच राजकीय पर्यावरण भिन्न असलेल्या...

अखेर मराठीत महाकवी निर्माण झाला

इमेज
मराठीत महाकाव्य जन्म आले -डॉ. प्रल्हाद वडेर (प्रस्तुत लेख वरील पुस्तकातून साभार  घेतला आहे  - साहित्याक्षर ) अलीकडे महाकाव्ये का निर्माण होत नाहीत? असा एक लेख फार वर्षांपूर्वी (कै.) वामन मल्हार जोशी यांनी लिहिला होता. तसाच प्रश्न लोक. कवी मनमोहन यांनीही ‘महाकवी जन्माला येण्या मराठीचे गर्भाशय कोते ?' असे विचारले होते. त्यांचे 'युगायुगाचे सहप्रवासी' हे खंडकाव्य वाचल्यावर त्यांच्यात ती ताकद होती यात शंका वाटत नाही. मराठीत महाकाव्य अद्याप निर्माण झालेले नाही. महाकाव्य न लिहिणारे महाकवी म्हणून स्वा. सावरकरांचा गौरव केला जातो पण त्यांनीही ते लिहिले नाही. 'छत्रपती शिवराय' नावाची महाकाव्ये काहींनी लिहिली. पण त्यांना महाकाव्ये म्हणणे कठीण आहे. 'महाकाव्य किंवा महाकादंबरी लिहिण्यासाठी जाज्वल्य मनोवृत्तीची आवश्यकता असते.' असा इतिहासकार राजवाडे यांचा अभिप्राय आहे. मराठीत गूढ काव्ये आहेत. त्यात बी, क्रांतीबुधे ही कवी मंडळी आठवतात. पण आतापर्यंत खरे महाकाव्य मात्र नव्हतेच. पण आता विदर्भातल्याच सुधाकर गायधनी यांनी खऱ्या अर्थाने महाकाव्य लिहिले आहे. त्याचे नाव आहे 'महा...

साळेगावकरांचा 'प्रसन्न प्रहार '

इमेज
(साळेगावकरांच्या विडंबन संग्रहाचे आज ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते माजलगाव येथे प्रकाशन होत आहे. त्या निमित्ताने - साहित्याक्षर )  ' प्रहार 'आणि तोही ' प्रसन्न ' हे कसं शक्य आहे? परंतु ही किमया साध्य केली आहे,प्रसिद्ध कवी आणि विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांनी. अनेक वर्ष प्रलंबित असलेला विडंबन कवितांचा संग्रह बाजारात आलेला आहे आणि त्या संग्रहाचे हे नाव आहे - प्रसन्न प्रहार. औरंगाबादच्या 'अभिसंधान प्रकाशना'ने हा देखणा विडंबनसंग्रह प्रकाशित केलेला आहे.  माजलगाव सारख्या मराठवाड्यातील एका तालुक्याच्या गावी राहून साळेगावकर यांनी कुणाला इजा न होता दोष दाखवून देणाऱ्या या उपहासिका तरल आणि अतिशय आणि प्रसन्नपणे निर्मिलेल्या आहेत. याचा साक्षीदार स्वतः मी सुद्धा आहे महाराष्ट्रात गाजलेला 'पुणे फेस्टिवल'चा मंच असो की परभणीचा 'शब्दसह्याद्री 'चा मंच असो, साळेगावकरांची कविता नेहमीच बहरत राहिली .भाष्य कविता किंवा विडंबन कवितांचा मराठी साहित्यामध्ये एक स्वतंत्र असा प्रवाह आणि परंपरा आहे. मात्र या कवितांचा अजून म्हणावा  तेवढा अभ्यास झालेला नाही. दैनिक ...