एक हृदयस्पर्शी खंडकाव्य : नवा मोहर गळतो
नवा मोहर गळतो : एक हृदयस्पर्शी खंडकाव्य ( प्रस्तुत खंडकाव्याला लिहिलेली ही प्रस्तावना असून खंडकाव्याच्या इतिहासाची माहिती व्हावी म्हणून ती इथे लेख स्वरूपात देत आहोत - संपादक ) खंडकाव्याची व्याख्या संस्कृतच्या 'साहित्य दर्पण' मध्ये आढळते. भाषा किंवा उपभाषा यामध्ये सर्गबद्ध किंवा एका कथेचे निरुपण करणारे काव्य म्हणजे खंडकाव्य होय. महाकाव्याचा तो एक अंश म्हणता येईल. खंडकाव्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतीलः १. खंडकाव्यत ही अखंड कथा आहे. २. कथेचा विन्यास , आरंभ, विकास, उत्कर्षबिंदू आणि प्रयोजन याप्रमाणे असतो. ३. ते आकाराने दीर्घ नसते. ४. त्यामध्ये आठ पेक्षा कमी सर्ग असावेत. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दीर्घ कवितेची टूम निघाली होती. लांब पल्ल्याची कविता लिहिणे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. त्यातच एका दीर्घ कवितेला पाच आकडी पुरस्कार मिळाल्याने हे लोण जास्तच फोफावले गेले. मात्र लवकरच हे आर्थिक प्रयोजन नष्ट झाल्याने ती टूम संपुष्टात आली, असो. ही सर्व चर्चा करण्याचे कारण म्हणजे बबन धुमाळ यांचे 'नवा मोहर गळतो' हे खंडकाव्य. खरंतर, ओवी छंदातील हे आख्यान म्हणता येईल. पण त्या...